Jack Leach: इंग्लंडला मोठा झटका, जॅक लीच लॉर्ड्स कसोटीमधून बाहेर

WhatsApp Group

Jack Leach: लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले.

न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शॉट लगावला. चेंडू सीमारेषेत जाण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात जॅक लीचच्या डोक्याला दुखापत झाली. इंग्लंडबरोबरच न्यूझीलंडच्या वैद्यकीय पथकाने लीचची तपासणी करून त्याला मैदानाबाहेर काढले.

जॅक लीचच्या जागी फिरकीपटू मॅथ्यू पार्किन्सनचा इंग्लिश संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पार्किन्सन्सचा हा पहिलाच कसोटी सामना असेल. क्रिकेटच्या नियमांनुसार, एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जाऊ शकतो.