काँग्रेसला मोठा धक्का, 6 बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

WhatsApp Group

हिमाचल प्रदेशातील सतत वाढत चाललेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. काँग्रेसचा व्हीप न पाळल्याने त्यांना आमदारपदावरून अपात्र ठरवण्यात आले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. या माजी आमदारांचे पक्षात स्वागत करताना ठाकूर म्हणाले की, त्यांच्या उपस्थितीमुळे भाजप मजबूत होईल. राज्यातील काँग्रेस सरकार आश्वासने पूर्ण करत नसल्याचा आरोप त्यांनी केला, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो हे सहा बंडखोर काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर आशिष शर्मा, होशियार सिंग आणि के एल ठाकूर या तीन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी राजीनामे दिले. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.