चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का; ‘या’ घातक खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

WhatsApp Group

आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा खेळाडू अंबाती रायडूने या सामन्यानंतर IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

अंबाती रायडूने सोशल मीडियावर पोस्ट करून अंतिम सामन्यानंतर निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली. अंबाती रायुडूने या ट्विटमध्ये निवृत्ती जााहीर करताना सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच गुजरात विरुद्धचा सामना हा माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल, असं रायुडूने म्हटलंय.

अंबाती रायडूने 2010 मध्ये खेळलेल्या आयपीएल सीझनमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त रायडू मुंबई इंडियन्स संघाचाही महत्त्वाचा भाग आहे. 2018 च्या मोसमात, अंबाती रायडू पहिल्यांदा चेन्नई संघाचा भाग बनला. रायुडूने आतापर्यंत 203 आयपीएल सामन्यांमध्ये 28.29 च्या सरासरीने एकूण 4329 धावा केल्या आहेत. अंबाती रायडूने गेल्या हंगामातही अचानक निवृत्ती जाहीर केली होती. पण नंतर त्याने तो निर्णय मागे घेतला.

या मोसमात अंबाती रायडूची आतापर्यंतची कामगिरी

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या या हंगामात अंबाती रायडूला प्रभावशाली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले. रायुडू या मोसमात 11 डावांत 15.44 च्या सरासरीने केवळ 139 धावा करू शकला आहे. रायुडूची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या 27 धावा आहे.