IND vs SA: आफ्रिकेला मोठा झटका, एडन मार्कराम मालिकेतून बाहेर

WhatsApp Group

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज एडन मार्कराम या मालिकेतून बाहेर पडला आहे. याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक निवेदन जारी केले आहे.

मार्कराम मालिका सुरू होण्यापूर्वी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर तो या मालिकेतील पहिले तीन सामने खेळू शकला नाही. गेल्या सात दिवसांपासून तो आयसोलेशनमध्ये आहे. मात्र आता तो आफ्रिकेला रवाना झाला आहे.  गेल्या सामन्यात विशाखापट्टणममधील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का आहे.

या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत आफ्रिका 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या टी-20मध्ये भारताकडून 48 धावांनी आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला. त्यातच आता एडन मार्कराम या मालिकेतून बाहेर पडला आहे त्यामुळे आफ्रिका संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.