भुवनेश्वर ‘स्विंग’ कुमारने रचला इतिहास, पहिल्याच षटकात हा पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज

WhatsApp Group

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला स्विंग कुमार म्हणणे चुकीचे ठरणार नाही, कारण पहिल्या काही षटकांमध्ये त्याचा चेंडू इतका स्विंग होतो, ज्याला तोड नाही. त्याच्या गोलंदाजीमध्ये जोस बटलरसारखे फलंदाज क्लीन बोल्ड होतात तर जेसन रॉयसारख्या फलंदाजांना चेंडू कोणत्या दिशेने जाईल हे समजत नाही. भुवनेश्वर कुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे.

भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पहिल्याच षटकात 14 बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये कोणत्याही गोलंदाजाने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच भुवनेश्वर कुमार पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात 14 बळी घेतले आहेत, तर डेव्हिड विलीने 13, अँजेलो मॅथ्यूजने 11, टीम साऊथीने 9 आणि डेल स्टेनने 9 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय भारताकडून भुवीनंतर आर अश्विनने (4 विकेट) पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेतले आहेत.

पहिल्या षटकात भारतासाठी सर्वाधिक T20 विकेट

  • 14 – भुवनेश्वर*
  • 4 – अश्विन
  • 3 – नेहरू
  • 2 – इरफान
  • 2 – झहीर