नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस, भीम आर्मीची घोषणा

WhatsApp Group

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिपण्णी केल्यामुळे राजकीय वर्तुळात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. आता या वादात भीम आर्मीनेही (Bhim Army) उडी घेतली आहे. नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी आज (ता.८) केली आहे. कानपूर हिंसाचाराची (Kanpur Violence) सूत्रधार नुपूर शर्मा असल्याचा आरोपही भीम आर्मीने केला आहे.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराचा अपमान केला आहे. त्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार जाणूनबुजून नुपूर शर्माला अटक करत नाही आहे. नुपूर शर्मा ही कानपूर हिंसाचाराची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही असा प्रश्न भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी केला आहे.