भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. या पोस्ट मध्ये तुमच्या लाडक्या भाऊ आणि बहिणीस शुभेच्छा देण्यासाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी घेऊन आलो आहोत.
भाऊबीजेचा आला सण,
बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम,
बहीण-भावाचं नातं असंच राहो,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊबीजेचा सण आहे,
भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे,
लवकर घे ओवाळून दादा,
गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
ओवाळिते तुज भाऊराया
कायम असू दे तुझी माझ्यावर माया
तुझ्यावर कधी न पडो दु:खाची काळी छाया
हेच मागणे तुझ्याकडे देवराया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिण भावाचा सण सौख्याचा,
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा,
आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा,
आला सण भाऊबीजेचा….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही.
ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya
या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे
दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा
मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा
तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा
तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.
तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा
मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा