ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; संजय राऊतांचे निकटवर्तीय शिंदे गटात

WhatsApp Group

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊ चौधरी (Bhau Chaudhary) हे शिंदे गटात सामील होणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आज रात्री साडे नऊ वाजता नागपूर येथे भाऊ चौधरी यांचा एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश होणार आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी आपल्या ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत निकटवर्तीय म्हणून भाऊ चौधरी यांना ओळखले जाते. भाऊ चौधरी हे नाशिकचा कारभार सांभाळत होते. संजय राऊत तुरुंगात जाताना आणि तुरुंगातून बाहेर येताना देखील भाऊ चौधरी त्यांच्यासोबत होते. मात्र, आता ते शिंदे गटात सामील होणार आहेत.

शिवसेनेकडून भाऊ चौधरी यांची हाकलपट्टी

भाऊ चौधरी एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या माहितीनंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे. असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा