कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहरा नॉट रिचेबल, भास्कर जाधव गुवाहाटीला दाखल?

WhatsApp Group

मुंबई – मागच्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरीकरून 40 च्यावर आमदार गुवाहाटी येथे घेऊन गेले. आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत काम करायच नाही महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गोटात हळूहळू शिवसेनेचे अनेक आमदार सामिल होत आहेत. दरम्यान कोकणातील शिवसेनेचे महत्वाचे नेते मानले जाणारे भास्कर जाधवही सध्या नॉट रिचेबल असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

भास्कर जाधव शिंदे गटात सामिल झाल्याची शक्यता आहे. जाधव हे गुहागरचे शिवसेनेचे आमदार आहेत ते सेनेचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. जाधव यांनी महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला जोरदार विरोध केला होता. परंतु त्यांना मागच्या दोन दिवसांपासून जाधव यांना शिंदे गटाकडून फोन करून संपर्क करण्यात येत होता. दरम्यान ते नॉट रिचेबल असल्यामुळे नेमके ते काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान ते सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान भास्कर जाधव यांच्ये स्विय सहाय्यक यांनी याबाबत खुलासा केला आहे. भास्कर जाधव हे चिपळूणमध्येच आहेत त्यांच्या बंधूची शस्रक्रिया झाल्यामुळे जाधव चिपळूण मध्ये आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनच जाधव गावी हे आल्याचे सांगण्यात आले.