![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी वेदांता फॉस्कॉनवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांना नीट वेदांता फॉस्कॉन बोलता येत नाही. त्यांना प्रकल्पाचे नाव नीट घेता येत नाही. ते फॉस्कॉनला पॉपकार्न बोलतात. त्यावरून त्यांची बुद्धिमत्ता काय आहे हे समजत. कोकणातील लोक रामदास कदमांकडे एक जोकर म्हणून पाहतात. कोकणातील जोकरपेक्षा आम्हीही त्यांना अधिक महत्त्व देत नाही, अशा तिखट शब्दात भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतला. तुमच्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीचे फोटो लागतात. आमच्या बॅनरवर राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे फोटो लागले तर नाही ना?, असा सवाल करत गुलाबराव पाटलांना आम्ही दसरा मेळाव्यातच उत्तर देऊ, असंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.
भास्कर जाधव यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. आम्हाला कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना एखादा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस माईक खेचून घेतात. देवेंद्र फडणवीस काय उत्तर द्यायचे ते सांगतात, असं भास्कर जाधव यावेळी बोलताना म्हणाले.