छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकाचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साडेसात हजार रुपये परत घेण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना येथे घडली आहे. ही घटना संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात घडली.
ODI World Cup 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांमध्ये फेरबदल
तरुणांवर चार राऊंड गोळीबार करण्यात आला. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमध्ये एक जण जखमी झाला आहे. हमद सालेह अब्दुल्ला कुतुब (वय 24) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. तर, फयाज पटेल असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे.