Bharat Jodo Yatra: राष्ट्रगीताऐवजी वाजले चुकीचे गाणे, नितेश राणेंनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

WhatsApp Group

Bharat Jodo Yatra: बुधवारी वाशीम येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताऐवजी चुकीचे गाणे वाजवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या चुकीसाठी भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरले. भाजप नेते नितेश राणे यांनीही या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तामिळनाडूचे भाजप नेते अमर प्रसाद रेड्डी यांनीही हाच व्हिडिओ शेअर करत लिहिले की, राहुल गांधी, हे काय आहे?

खरं तर, महाराष्ट्रातील वाशीममध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते एका मंचावर लोकांना संबोधित करत होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी शेजारी उभ्या असलेल्या नेत्यांना राष्ट्रगीत वाजवण्यास सांगितले मात्र चुकून दुसरेच गाणे वाजू लागले. सुमारे पाच सेकंद राहुल गांधी सावधान स्थितीत उभे राहिले, पण नंतर चुकीचे गाणे वाजवले जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी नेत्यांना थांबवून राष्ट्रगीत वाजवण्यास सांगितले. मात्र, राहुल यांनी जे काही बोलले, तरीही काही नेत्यांना त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.

भाजप नेते नितेश राणे यांनी Papu ka comedy circus असल्याचे ट्विट केले आहे. त्याचवेळी भाजप नेते अमर प्रसाद रेड्डी यांनीही हाच व्हिडिओ शेअर करत लिहिले की, राहुल गांधी, हे काय आहे? त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सनीही राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने लिहिले की, हे नेपाळचे राष्ट्रगीत आहे का? दुसर्‍या यूजरने लिहिले की, गाणे चुकीचे आहे हे समजण्यासाठी राहुल यांना 5 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला. रामेश्वर सनातनी नावाच्या युजरने लिहिले की, चुकीचे राष्ट्रगीत गाऊन त्याचा अपमान केल्याप्रकरणी या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.