गुजराती-राजस्थानी निघून गेले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

WhatsApp Group

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विधानाने बाहेरून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या लोकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातून (Thane) काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाने महाराष्ट्रीयन विरुद्ध बाहेरील व्यक्ती या मुद्द्याला हवा दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, मी लोकांना सांगतो की, जर तुम्ही गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून हाकलले तर तुमच्याकडे एकही पैसा शिल्लक राहणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही.

1960 पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगळी राज्ये नव्हती तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बहुतेक लोक मराठी आणि गुजराती भाषा बोलत होते. जेव्हा भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्याची मागणी होत होती, तेव्हा राज्य पुनर्रचना कायदा 1956 अन्वये तत्कालीन जवाहरलाल नेहरू सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सीचे दोन भाग केले. एकाचे नाव महाराष्ट्र आणि दुसर्‍या राज्याचे नाव गुजरात करण्यात आले.

महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिवस एकाच दिवशी साजरा केला जातो. दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस 1 मे रोजी आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांची निर्मिती होऊन 62 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाने विरोधक आक्रमक झाले आहेत.