
मराठी सुविचार छोटे जे तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये अथवा व्हॉट्सअपला आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता. कधी कधी आपण उदास होतो आणि अशा वेळी प्रेरणेची आणि उत्साह देण्याची गरज असते. अशावेळी आपल्या मित्रमैत्रिणींना असे मराठी सुविचार Suvichar In Marathi) पाठवून त्यांचा उत्साह वाढवा आणि त्यांना बळ द्या.
1 | आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. |
2 | सुखी आणि आनंदी रहायचं असेल तर समाजात राहण्याचा प्रयत्न करा. एकटे रहाल तर दुखः पदरी पडेल. |
3 | पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा , पुत्री व्हावी ऐसी भागीरथी तिन्ही कुळ उद्धरती. |
4 | स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. |
5 | अपयश हि यशाची पहिली पायरी आहे. |
6 | जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! |
7 | भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. |
8 | आपण नेहमी आपल्या कमी असलेल्या माणसाकडे बघितले की आपल्याला कळते की आपण किती सुखी आहोत. |
9 | दुसऱ्याच्या तोंडाला काळे फासताना प्रथम स्वतःच्या हाताला काळे लागते हे पाहा. |
10 | कावळ्याने कधी कोकीळेशी बरोबरी करू नये कारण कोकीळा कुहू कुहूच गाणार आणि कावळा काव काव करून अपशकूनच करणार. |
कोणाचेच आयुष्य हे सरळसोट नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हा असतोच. अशावेळी काही प्रेरणात्मक कोट्सची अथवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी विचारांची गरज असते. अशावेळी मराठी सुविचार नक्कीच तुमची मदत करतात.
11 | माणसाला जीवनात पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारीक ज्ञानच जगायचे कसे ते शिकविते. |
12 | माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत विद्यार्थी असतो. |
13 | शाळा कॉलेजात प्रथम श्रेणीने पास झालेला माणूस जेव्हा जबाबदार व्यक्ती म्हणून व्यावहारिक जगात उतरतो तेव्हाच त्याने घेतलेल्या शिक्षणाचा खरा कस लागतो. |
14 | भोपळ्याचा वेल मोडक्या काठ्यांच्या सहाय्यानेच वर चढतो पण वरती गेल्यावर सुद्धा काठ्यांना विसरत नाही. तसेच शिकून कितीही मोठा झाला तरी माणसाने त्याच्यासाठी ज्या ज्या हातांचे सहाय्य झाले आहे त्यांना अंतर देऊ नये. |
15 | सरोवरात अनेक बदके पोहताना दिसतात. पण हंस मात्र एकच असतो. |
16 | कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहचण्याची अपेक्षा करू नये. |
17 | सत्तालालसेपायी माणूस आपल्या स्वतःला अनेक शत्रू निर्माण करतो. |
18 | दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होणे हे पण शहाणपणाचे असते. |
19 | जगात चिरंजीव कोणीच नाही, शिवाय सप्तचिरंजीव मारुती, अश्वत्थामा, बिभिषण, परशुराम, कृपाचार्य, कार्तिकेय. |
20 | आपण उच्चकुळीचा आणि दुसरा नीच कुळीचा अशा दृष्टीने राहू व वागू नये. |
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते हे नेहमी लक्षात ठेवा आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही हेदेखील सत्य आहे.
21 | घेतलेल्या विद्येचा योग्य वापर करा. मग तुमची ती विद्या विधायक असो अथवा विघातक. |
22 | ज्ञानाने माणसाची विद्वत्ता वाढते पण सदाचार वाढतोच असे नाही. १६८. सुविद्य माणसाच्या मनात नेहमी सुविचारच असतात. |
23 | मुलांनो सुविचार आचरणात आणा, केवळ वाचनासाठी पुस्तक संग्रह करू नका. |
24 | अविरत परिश्रम करून मिळणाऱ्या यशाचा अमृत कुंभ हातात घेण्यापूर्वी हलाहल पचवावे लागते. |
25 | लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. |
26 | आपल्या छोट्या घरातसुद्धा सुखामृत भरलेले असताना बाहेरील सुखाच्या मृगजळामागे जो धावतो तो एक मूर्ख होय. |
27 | जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. |
28 | सोन्याची सुरी मिळाली म्हणून कोणी गळा कापून घेत नाही. |
29 | केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. |
30 | पुरुषाच्या हातावरच्या रेषा पहावयाच्या नसतात तर हातावरचे घठे बघावयाचे असतात. |
ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही.
31 | तोंडातून गेलेला शब्द दहा गाड्या पाठविल्या तरी परत येत नाही. |
32 | तलवारीचा वार भरून निघतो. शब्दांचा घाव मात्र सतत मरण देत असतो. |
33 | शरणागताला अभय द्या, वाटेवरच्या वाटसरूला पाणी द्या आणि घरी आलेल्या अतिथीला सुग्रास भोजन द्या हाच खरा गृहस्थधर्म. |
34 | भवसागर तरून न्यायला गुरुवं लागतोच तेव्हा आपला गुरु कराल तो पारखूनच करा. |
35 | प्रत्येकाला जीवनात तीन ऋण फेडायचे असतात. मातृऋण, पितृऋण आणि देशाचे ऋण. |
36 | समाजात मिळून मिसळून रहा कारण ज्या समाजात तुम्ही रहाता त्याचेसुद्धा तुम्ही काही देणे आहात. |
37 | मनी नाही भाव नी देवा मला पाव. |
38 | जीवन जगाल तर पारिजातकाच्या फुलासारखे जगायचा प्रयत्न करा, साधे पण कोमल सौंदर्य तरीपण सुगंधी. |
39 | जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. |
40 | आपल्या संस्कृती मूल्यांचे जतन करा. तिची कबर खोदू नका. |