जीवनावर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

WhatsApp Group

काही सुविचार हे जीवनावर आधारित असतात. त्या सुविचारांमुळे आपणास आनंदी जीवन कसे जगावे याचे ज्ञान कळते. म्हूणन आम्ही काही जीवनावर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार घेऊन आलो आहोत.

“माणसाचा जीवनात येणारी संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात.”
“डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.”
“ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ, घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.”
“आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.”
“स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.”

ज्या माणासाजवळ सुंदर विचारांची शिदोरी आहे तो माणून कधीही अयशस्वी होऊ शकत नाही किंवा तो एकटा पडू शकत नाही, कारण महान विचारांच्या लोकांवर प्रेम करणारे अनेकजण असतात.

“आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.”
“तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.”
“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
“प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत.”
“प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही, आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.”

आपल्या पाल्या समोर कायम, सकारात्मच बोला, इतरांच्या आनंदात आपल्या पाल्याला सामील व्हायला शिकवाच पण इतरांच्या दुःखात, त्रासात सुद्धा त्यांच्या सोबतीला जायला शिकवा.

“एकदा वेळ निघून गेली की, सर्व काही बिघडून जातं मग कितीही, पश्चाताप करून उपयोग नसतो.”
“हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा, स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.”
“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
“जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.”
“जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्याला सांभाळत न्यावं लागतं.”