Marathi Suvichar | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

WhatsApp Group

नको असलेले तण, गवत स्वतःहूनच जमिनीत निर्माण होतात, पण हवे असलेले झाड मात्र आपल्याला निर्माण करावे लागते, तसेंच चांगले विचार, आपल्या पाल्याच्या मनात जाणीवपूर्वक निर्माण करा, नाहीतर नको ते विचार मात्र,त्याच्या मनात सहज निर्माण होतील.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

मुलांनो, शिवाजी महाराजाची वेशभुषा करणे, तशी दाढी ठेवणे, सोपे आहे पण महाराजांच्या गुणांचा अभ्यास करा, त्यांचे गुण आत्मसाथ करा, वाईट व्यसनांपासून मुक्त जीवन हा महाराजाचा महत्वाचा गुण आहे, मेहनत, सातत्य, चिकाटी, दूरदृष्टी, पराक्रम आणि स्वत:चे साम्राज्य निर्माण करण्याची इच्छाशक्ति. महाराजांना एकच वेड होते, स्वराज्याचे. हे सर्व जर करु शकलात ,तरच महाराजांना खरी वंदना दिल्यासारखी होईल.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

मोबाईलचा वापर, जेवणात ज्याप्रमाणे, जितका वापर मिठाचा होतो, तितकाच आणि तसाच वापर जीवनात मोबाईलचा असावा, अगदी चवीपुरता. जेवणात मीठ नसेल तर जेवण अळणी होईल, पण तेच मीठ जर जेवणात अती झाले तर जेवण खाण्यालायक नसणार, तसेच मोबाईल अती झाला तर , जीवनाची वाट लागलेली असेल”

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.