Marathi Suvichar सुंदर मराठी सुविचार

WhatsApp Group

सुविचार हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात. 

चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्तम व सुंदर Marathi Suvichar आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. ते आपण विविध माध्यमातून आपल्या कुटुंबात, मित्र-मैत्रिणी, प्रियजनांना शेअर करून त्यांना पाठवू शकता.

✓ विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
✓ आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
✓ प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.
✓ ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात, तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.
✓ मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.
✓ एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो. मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
✓ दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
✓ कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री.

✓ नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
✓ ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
✓ रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन
✓ भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले.
✓ आपण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
✓ काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.
✓ मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो.
✓ थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

✓ स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही.
✓ परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी.
✓ धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो.
✓ आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.
✓ यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतः ला ओळखणे.
✓ नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
✓ तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.
✓ स्वतःला कमजोर समजणे हि मोठी चूक आहे.