BCCI Awards 2024: शुभमन गिलला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार, रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार!

0
WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. बीसीसीआयने चार वर्षांनंतर वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्यामध्ये शुभमन गिलची बीसीसीआयने 2022-23 मधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. शुभमन गिलसाठी 2022-23 हे वर्ष खूप चांगले राहिले.

2023 मध्ये, गिल पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकही खेळला होता. त्यामुळे त्याला हा मोठा पुरस्कार मिळाला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाची 2021-22 वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आली. जसप्रीत बुमराहने 2023 मध्ये जास्त सामने खेळला नाही. 2023 मध्ये बुमराह दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर होता. याशिवाय टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.

या खेळाडूंना पारितोषिके मिळाली

1. शुभमन गिल, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (2022-23)
2. जसप्रीत बुमराह, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (2021-22)
3. आर अश्विन, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऑल राउंडर (2020-21)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार

1. यशस्वी जैस्वाल, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2022-23)
2. श्रेयस अय्यर, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2021-22)
3. अक्षर पटेल, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2020-21)
4. मयंक अग्रवाल, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2019-20)

पॉली उम्रीगर पुरस्कार 2019-20

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला 2019-20 चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पॉली उम्रीगर पुरस्कार मिळाला आहे.

आर अश्विनने सर्वाधिक कसोटी विकेट (2022-23) दिलीप सर देसाई पुरस्कार जिंकला. याशिवाय यशस्वी जैस्वालने सर्वाधिक कसोटी धावा (2022-23) साठी दिलीप सर देसाई पुरस्कार जिंकला.

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

1. जयदेव उनाडकट
2. शम्स मुलाणी
3. जलज सक्सेना

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला पदार्पण पुरस्कार

1. प्रिया पुनिया, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2019-20)

2. शफाली वर्मा, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2020-21)

3. सबिनेनी मेघना, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2021-22)

4. अमनजोत कौर, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (2022-23)