Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्तम व सुंदर Marathi Suvichar आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
✓ ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
✓ रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन
✓ भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले.
✓ आपण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
✓ काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.
✓ मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो.
✓ थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.
✓ प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.
Marathi Suvichar जे आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा परिणामकारकतेने सामना करू शकतो.
✓ मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
✓ स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही.
✓ परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी.
✓ धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो.
✓ आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.
✓ यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतः ला ओळखणे.
✓ नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
✓ तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.
चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात.
✓ स्वतःला कमजोर समजणे हि मोठी चूक आहे.
✓ स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.
✓ जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.
✓ भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.
✓ कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.
✓ ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.
✓ आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते.
✓ जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.
संघर्ष हा आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे हे लहानपणापासूनच मुलांना शिकवले पाहिजे म्हणजे पुढे जाऊन त्यांना नैराश्याशी लढण्याचे बळ येईल. विद्यार्थ्यांनी हे सुविचार नेहेमी वाचावे.
✓ स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.
✓ आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.
✓ विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
✓ शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.
✓ चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
✓ समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
✓ आपण जे पेरतो तेच उगवतं.
✓ सरावानेच अचूकता निर्माण करता येते.