प्रो कबड्डी लीग 2022 Pro Kabaddi League 2022 च्या दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात, बेंगळुरू बुल्सने Bengaluru Bulls गुजरात जायंट्सचा Gujarat Giants 49-29 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. आता बेंगळुरू बुल्सचा सामना 23 फेब्रुवारीला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दबंग दिल्लीशी होणार आहे.
स्टार रेडर पवन शेरावतने Pawan Sehrawat बेंगळुरू बुल्सच्या विजयात चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या संघासाठी सुपर 10 ची जबरदस्त चढाई केली. त्याने आपल्या संघासाठी एकूण 13 गुण मिळवत कर्णधारपदाला साजेल अशी खेळी केली. पवनला बचावपटू महेंद्र सिंग, भारत आणि रेडर रणजित चंद्रनची साथ होती. महेंद्रने 5 गुण, भारताने 6 आणि रणजीतने 7 गुण मिळवले. सौरव आणि अमन यांनीही ४-४ गुण मिळवले. दुसरीकडे गुजरात जायंट्सकडून रेडर राकेशने 8 गुण आणि महेंद्र राजपूतने 5 गुण मिळवले.
SEMI-FINALS HERE WE COME ????????????????????
Navu ottige nillutteve, ottige adutteve, ottige kelsa madutteve hagu tandavagi navu ottige gellutteve????#GGvBLR | #FullChargeMaadi | #SuperhitPanga | #VivoProKabaddi | #Playoffs pic.twitter.com/LxHDsD5tAB— Bengaluru Bulls (@BengaluruBulls) February 21, 2022
बेंगळुरू बुल्सने गुजरात जायंट्सविरुद्ध पहिल्या हाफपासूनच वर्चस्व राखले होते. पहिल्या हाफमध्ये बेंगळुरू बुल्सचा स्कोअर 24 होता, तर गुजरात जायंट्सचा स्कोर 17 होता. पहिल्या हाफमध्ये बेंगळुरू बुल्सने गुजरात जायंट्सला एकदा ऑलआऊटही केले. दुसऱ्या हाफमध्ये बेंगळुरू बुल्सचा स्कोअर 25 होता, तर गुजरात जायंट्सचा स्कोर फक्त 12 होता. दुसऱ्या हाफमध्ये बेंगळुरू बुल्सने गुजरातला दोनदा ऑलआउट केले.