
कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एका 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत मोलकरणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्ती बाला सुब्रमण्यम यांचा मृत्यू झाला होता. 17 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या जेपी नगरमध्ये एका वृद्ध बालाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळला होता. महिला मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, तिला भीती वाटत होती की पोलीस आपल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करतील. या कारणावरून तिने मृतदेह प्लास्टिकमध्ये व बेडशीटमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. मृतदेह प्लास्टिकमध्ये पॅक करण्यासाठी पती आणि भावानेही मदत केल्याचे मोलकरणीने पोलिसांना सांगितले.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वृद्ध व्यक्तीचे मोलकरणीसोबत प्रेमसंबंध होते. वृद्ध व्यक्ती आपल्या नातवाला बॅडमिंटन क्लाससाठी सोडण्यासाठी 16 नोव्हेंबर रोजी घरून निघाला. त्यानंतर त्यांनी आपल्या सुनेला फोन करून सांगितले की, मला जरा काम आहे त्यामुळे यायला उशीर होईल. यानंतर तो प्रेयसीच्या घरी पोहोचला. मोलकरणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, बराच उशीर होऊनही घरी न पोहोचल्याने वृद्ध व्यक्तीचा मुलगा आणि सून यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूचे कारण शोधण्यात पोलीस गुंतले होते, त्याच दरम्यान मोलकरणीने धक्कादायक खुलासा केला आहे. खरं सांगितल्याबद्दल तिच्यावर पोलिस गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती वाटत असल्याचं मोलकरणीने पोलिसांना सांगितलं. मात्र असं असतानाही पोलिसांना हकीकत सांगितली. मोलकरणीने सांगितले की, तिचे वृद्ध व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मृत्यूदिवशी वृद्ध व्यक्ती मोलकरणीच्या घरी आला आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवत असतानाच वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नंतर पती आणि भावाच्या मदतीने तिने वृद्ध व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकमध्ये व बेडशीटमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. कोणाला काही कळण्याआधीच तिघांनी मिळून भीतीने मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.