सिनेसृष्टीवर शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

WhatsApp Group

चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिने वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घेतला जगाचा निरोप. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री एंड्रिलाच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीच्या डोक्यात रक्त गोठले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन झाले आणि तेव्हापासून ती कोमात व्हेंटिलेटरवर होती.

एंड्रिला शर्मा हिला ब्रेन स्ट्रोकमुळे 1 नोव्हेंबरच्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 दिवस ती जीवन-मरणाची लढाई लढत होती. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री एंड्रिलाला शनिवारी संध्याकाळी अनेक हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे तिची प्रकृती सतत खालावत गेली. रविवारी दुपारी एकच्या सुमारास अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. एवढ्या लहान वयात एंड्रिला शर्माला दोनदा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला, पण तिने हार मानली नाही आणि कॅन्सरशी लढाई जिंकली. जेव्हा अँड्रिया शर्माला दुसऱ्यांदा कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा तिच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Urfi Javedनं मोबाईल आणि चार्जरपासून बनवला ड्रेस, पहा व्हिडिओ

एंड्रिला शर्माच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने टीव्ही ते ओटीटीपर्यंत काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ऐंद्रिला शर्माने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. ती पहिल्यांदा टीव्ही शो झूमरमध्ये दिसली आणि त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय शोमध्येही मुख्य भूमिका साकारल्या.