
मानवी जीवनात लैंगिक संबंध हे केवळ शारीरिक आनंदापुरते मर्यादित नसून, मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. अनेक जोडपी दिवसाच्या विविध वेळेत संभोग करतात; मात्र तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या वेळी संभोग केल्याने शरीराला व मनाला विशेष फायदे मिळतात.
संपूर्ण दिवस काम, ताण-तणाव आणि धावपळीत घालवल्यानंतर रात्रीचा वेळ हा जोडप्यांसाठी शांततेचा असतो. या वेळी शरीर रिलॅक्स अवस्थेत असते आणि त्यामुळे लैंगिक आनंद अधिक खुलतो. झोपेच्या आधी केलेला संभोग शरीरातील ताणतणाव कमी करतो, मेंदूत एंडॉर्फिन व ऑक्सिटोसिन सारखे हॉर्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे मन प्रसन्न होते.
रात्रीच्या संभोगामुळे झोप उत्तम लागते. दिवसाचा थकवा घालवून शरीर अधिक शांत झोपेच्या गर्तेत जाते. परिणामी दुसऱ्या दिवशी ताजेतवानेपणा जाणवतो. यामुळे कार्यक्षमता व मूड सुधारतो.
तज्ज्ञ सांगतात की रात्रीच्या वेळी सेक्स केल्याने दांपत्यातील भावनिक बंध अधिक घट्ट होतात. एकत्र घालवलेला हा खास क्षण नात्यात विश्वास, प्रेम आणि जवळीक वाढवतो.
आरोग्याच्या दृष्टीनेही हे फायदेशीर आहे. नियमित रात्रीचे संभोग हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि हार्मोन्सचे संतुलन राखणारे ठरते. तसेच महिलांमध्ये मासिक पाळीपूर्व होणारा त्रास (PMS) आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
म्हणूनच, दिवसाचा थकवा दूर करून नात्यात गोडवा वाढवण्यासाठी रात्रीचा वेळ हा सेक्ससाठी उत्तम मानला जातो. मात्र प्रत्येक दांपत्याने आपली सोय, वेळ आणि आराम लक्षात घेऊनच संभोग करावा हे महत्त्वाचे आहे.