Health Tips: उन्हाळ्यात काकडी आहे अमृतासमान! ‘या’ 5 पदार्थांसोबत खाल्ल्यास मिळेल दुप्पट ऊर्जा आणि चमकणारी त्वचा

WhatsApp Group

Benefits of eating cucumber in summer

वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि थकवा जाणवणे या समस्या सामान्य आहेत. अशा परिस्थितीत ‘काकडी’ हे केवळ एक फळभाजी नसून ते आरोग्यासाठी वरदान ठरते. काकडीत कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ती उत्तम मानली जाते. हाडांच्या मजबुतीपासून ते पचनसंस्था सुधारण्यापर्यंत आणि त्वचेला तजेला देण्यापर्यंत काकडीचे अनेक फायदे आहेत. तज्ज्ञांच्या मते, काकडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी, के आणि ए मुबलक प्रमाणात असतात.

काकडी आणि लिंबू: शरीराला डिटॉक्स करण्याचा सर्वोत्तम मार्ग

उन्हाळ्यात लिंबू आणि काकडीचे मिश्रण तुम्हाला केवळ ताजेतवाने ठेवत नाही, तर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासही मदत करते. काकडीचे काप करून त्यात लिंबाचा रस, थोडे पाणी आणि काळे मीठ मिसळून ब्लेंडरमध्ये फिरवा. हे ‘डिटॉक्स ड्रिंक’ प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. तुम्ही रात्री काकडी आणि लिंबाचे काप पाण्यात टाकून ‘डिटॉक्स वॉटर’ देखील तयार करू शकता.

काकडी आणि ताक: झटपट एनर्जीसाठी ‘मसाला ताक’

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडी आणि ताक हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. काकडीतून मिळणारी खनिजे आणि ताकातून मिळणारे व्हिटॅमिन डी, बी१२ आणि प्रोबायोटिक्स यामुळे आरोग्याला दुप्पट फायदा होतो. काकडी किसून ताकात मिसळा, त्यात भाजलेले जिरे, पुदीना, हिरवी मिरची आणि काळे मीठ टाकून ‘मसाला काकडी ताक’ तयार करा. हे पेय शरीराला त्वरित ऊर्जा देते.

पुदीना आणि काकडी: रिफ्रेशिंग चव आणि पचन सुधारते

पुदीना आणि काकडीचा वापर करून तुम्ही उत्तम कोशिंबीर किंवा डिटॉक्स पाणी बनवू शकता. पुदीन्याची पाने आणि बारीक चिरलेली काकडी, त्यात थोडे लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून फ्रेश सॅलड तयार करा. हवे असल्यास यात पनीरचे तुकडे किंवा उकडलेले चणे टाकून त्याची पोषकता वाढवू शकता. हे मिश्रण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास अत्यंत मदतगार ठरते.