बहुगुणी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे Benefits of aloe vera

WhatsApp Group

Health Benefits of Aloe vera: कोरफड ही वनस्पती हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या अनेक समस्यांवर कोरफड एक चांगला आणि नैसर्गिक उपाय आहे. केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचा हा एक स्वस्त आणि उत्तम मार्ग आहे.

कोरफड त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझिंग करण्याबरोबरच केसांना रेशमी आणि चमकदारही बनवते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲमीनो ॲसिडसह इतर अनेक पोषक घटक यात आढळतात. जे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. कोरफड आपल्या केसांना आणि त्वचेला कसा फायदा करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.​

कोरफडीचे त्वचेसाठी फायदे

  • जर तुम्हाला चेहरा मुरुमांच्या डागांपासून वाचवायचा असेल तर रोज कोरफड लावा.
  • कोरफडीचा रस किंवा जेल चेहऱ्यावर दररोज 20 मिनिटे लावावे आणि स्वच्छ ताज्या पाण्याने धुवावे. हे त्वचा मऊ करण्यास आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते.
  • कोरफड जेल हे मेकअप रिमूव्हर म्हणूनही काम करते. एलोवेरा जेल मेकअप काढण्यासाठी वापरणे खूप चांगले आहे. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.
  • यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत जे चेहऱ्यावरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. कोरफड जेल रोज लावल्याने तुमची त्वचा तरुण आणि सुंदर राहील.

​कोरफडीचे केसांसाठी फायदे

  • जर केस खूप गळत असतील तर कोरफड लावा. नवीन केस लवकरच वाढण्यासाठी मदत होईल.
  • कोरफड लावल्याने तेलकट टाळूच्या समस्येपासून सुटका मिळते, कारण यात केसांमधे असेलेले जास्त प्रमाणातीस तेलाचे नियंत्रण करण्याचा गुणधर्म असतो.
  • कोरफडीमध्ये A, C आणि E ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व निरोगी पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केसांना चमकदार बनवतात. त्यात असलेले व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ॲसिड केस गळती रोखण्यास मदत करतात.
  • कोरफड रक्तप्रवाह वाढवण्यासाठी प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही ते तुमच्या केसांवर किंवा टाळूवर वापरता तेव्हा ते तिथे रक्ताभिसरण वाढवते. यामुळे केसांची वाढ वाढते. यासह, नवीन केस देखील जलद येतात.
  • टक्कल दूर करण्यासाठी कोरफड प्रभावी आहे. त्यात नवीन केस वाढवण्याचे गुणधर्म देखील आहेत. यासाठी तुम्ही शैम्पू म्हणून कोरफडचा वापर करू शकता.