बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार होताच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकला, 64 चेंडूत शतक ठोकले शतक

WhatsApp Group

इंग्लंडचा कसोटी संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली नवी उंची गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) नुकतीच बेन स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदी नियुक्ती केली आहे. जो रूटच्या ( Joe Root) नेतृत्वाखाली इंग्लंडने अनेक यशस्वी मालिका जिंकल्या, परंतु मागील दोन-अडीच वर्षांत इंग्लंडची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली.

त्यामुळे ECB ने हा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरल्यानंतर बेन स्टोक्सही आता मैदानावर परतला आहे आणि कौंटी क्रिकेटमध्ये त्याने शुक्रवारी तुफान फटकेबाजी दाखवली आहे. डरहम विरुद्ध वॉर्कस्टरशायर ( Worcestershire vs Durham ) या सामन्यात त्याने दमदार शतक ठोकले आहे.

डरहमकडून खेळणाऱ्या स्टोक्सने वूस्टरशायरविरुद्ध 88 चेंडूत 161 धावांची खेळी करत आपला दमदार खेळ पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. यादरम्यान त्याने एकाच षटकात 34 धावा केल्या आणि अवघ्या 64 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

डरहमच्या डावातील 117 व्या षटकात स्टोक्सने धावांचा पाऊसच पाडला. फिरकीपटू जोस बेकर याच्या षटकात स्टोक्सने सलग पाच षटकार लगावले. अखेरच्या चेंडूवर चौकार गेला. स्टोक्सने पहिल्या पाच चेंडूवर पाच षटकार लगावले. नंतर शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. एकाच षटकात सहा षटकार लगावण्याचा विक्रम थोडक्यात हुकला.

बेन स्टोक्सने दीड शतकी खेळीमध्ये 17 षटकारांचा पाऊस पाडला. काऊंटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 17 षटकार लगावण्याचा विक्रम स्टोक्सच्या नावावर जमा झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सायमंडसने एकाच डावात 16 षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम शुक्रवारी स्टोक्सने मोडला.