IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

WhatsApp Group

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. त्याचबरोबर ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी स्टार गोलंदाज मोहम्मद शमी कोविड पॉझिटिव्ह आढळला आहे. मोहम्मद शमीला कोरोनाचा फटका बसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून तो बाहेर पडला आहे. त्याचबरोबर शमीच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाचा अनुभवी स्टार गोलंदाज मोहम्मद शमी कोविड पॉझिटिव्ह आढळला आहे. मोहम्मद शमीला कोरोनाचा फटका बसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून तो बाहेर पडला आहे. त्याचबरोबर शमीच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला सांगतो की शमी बऱ्याच दिवसांनी भारतीय संघात परतणार होता. टी-20 विश्वचषकात भारतासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून त्याचा सहभाग होता. आता त्याचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 179 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 114 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर 57 सामने हरले आहेत. याशिवाय तीन सामने टाय झाले तर पाच सामन्यांचा निकाल लागला नाही.

ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाले तर कांगारूंनी आतापर्यंत 158 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामने जिंकले तर 70 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 6 सामन्यांचा निकाल नाही.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा