Beer Price Hike: बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी! किमतीत मोठी वाढ होणार

WhatsApp Group

Beer Price Hike: महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आता या महागाईचा बिअरप्रेमींनाही झटका बसणार आहे. बिअरच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आता बिअरच्या दरात देखील वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत अनेक बिअर उत्पादक कंपन्यांनी दिले आहेत.

देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. ट्रान्सस्फोर्टच्या खर्चामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. त्यात बिअरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या बार्लीच्य (barley) दरात तीन महिन्यांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यासोबतच बॉटलिंग कंपन्यांनी देखील दरात 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर लेबलपासून ते बॉक्सपर्यंतच्या किमती देखील वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत बिअरच्या किमती वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांनी तयारी केली आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासोबत अनेक शहरांमध्ये बिअरचे दर वाढवण्यात येणार आहे. परंतु ग्राहकांवर जास्त बोजा पडणार नाही, याची देखील काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती युनायटेड ब्रुअरीजचे सीईओ ऋषी परदल यांनी दिली आहे. यूबी कंपनी हेनेकेन आणि किंगफिशर ब्रँड अंतर्गत बिअर बनवते. यापूर्वी कंपनीने बीरा 91 ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत.