
सोशल मीडिया क्वीन जन्नत जुबेरच्या लोकप्रियता खूपच वाढत चालली आहे. जन्नत जुबेर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करते. या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 41.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. जन्नतचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आता जन्नतच्या मालदीव व्हेकेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
जन्नत जुबैरने मालदीवमधील काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे अनेक आकर्षक फोटो शेअर केले आहेत. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या वॉटर व्हिलामध्ये जन्नत तिच्या सुट्टीतील प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवताना दिसत आहे.
View this post on Instagram
जन्नतने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेससह काळ्या सनग्लासेसने तिचा विदेशी लुक पूर्ण केला. सुंदर मेकअप आणि वाऱ्यावर उडणारे मोकळे केस, जन्नतच्या सौंदर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच असेल. असे हे फोटो तिने शेअर केले आहेत.
View this post on Instagram
सुपर गॉर्जियस फोटोंसोबतच जन्नत जुबेरने स्वतःचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जन्नतची प्रेमळ शैली, किलर अॅटिट्यूड आणि वागणूक तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ लाखो लोकांनी लाइक केले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते फायर आणि हार्ट इमोजीसह त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.