बीसीसीआयची मोठी कारवाई, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती केली बरखास्त

WhatsApp Group

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील मानहानीकारक पराभवानंतर बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (18 नोव्हेंबर) चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली. बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट करून राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत.

BCCIने ट्वीट करत निवड समितीच्या पाच जागांसाठी अर्ज मागवल्याची माहिती दिली आहे. अर्ज करण्याची  अखेरची तारीख 28 नोव्हेंबर 2022 इतकी आहे.

याच महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. संघाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर अनेक खेळाडू फॉर्मात नसतानाही त्यांच्या संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याशिवाय निवड समिती बरखास्त करण्याचीही मागणी करण्यात आली.