नव्या जर्सीसह भारतीय संघ खेळणार टी-20 विश्वचषक!

WhatsApp Group

नवी दिल्ली – टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहेत. या आधी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

बीसीसीआयने ट्विटरवर विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा नव्या जर्सीतील फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. ‘ही भारताची नवी जर्सी कोट्यवधी चाहत्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित आहे. असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.


संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज आहे. या जागतिक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ही विश्वचषक स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. याआधी भारतीय क्रिकेट मंडळाने टीम इंडियाची नवीन जर्सी चाहत्यासोमर आणि आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धा 2016 नंतर पहिल्यांदाच खेळवली जात आहे. गेल्या वेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून जेतेपद पटकावले होते. 2016 मध्ये भारताने सुपर -10 च्या गट सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता. मात्र उपांत्य फेरीत विंडीजकडून भारताला 7 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ही टी-20 विश्वचषक स्पर्धा विराट कोहलीसाठी खास असणार आहे. कारण या स्पर्धेनंतर विराट भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. विराटनंतर रोहित शर्माकडे भारताच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे.