बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आले विराटच्या मदतीला; म्हणाले…’त्याची आकडेवारी पाहा’

WhatsApp Group

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल सौरव गांगली म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी पहा, अशी आकडेवारी क्षमता आणि गुणवत्तेशिवाय नसते. तो सध्या कठीण काळातून जात आहे, त्याला माहित आहे की तो स्वतः एक महान खेळाडू आहे. सौरव गांगली पुढे म्हणाले, ‘विराट कोहलीला माहित आहे की त्याची अलीकडची कामगिरी त्याच्या स्वत:च्या विक्रमाइतकी चांगली नाही. विराट कोहली लवकरच पुनरागमन करेल.

बीसीसीआयचे अध्यक्ष पुढे म्हणाले,  विराट कोहलीला त्याचा मार्ग शोधावा लागेल. या सर्व गोष्टी खेळात होतील. सचिन, राहुल आणि माझ्यासोबत हे सर्वांसोबत घडले आहे. भविष्यातील खेळाडूंच्या बाबतीतही हे घडणार आहे. हा खेळाचा एक भाग आहे आणि एक खेळाडू म्हणून तुम्हाला फक्त तुमचा खेळ खेळायचा आहे.

खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने घसरत आहे. विराट कोहलीला 6 वर्षांनंतर प्रथमच ICC कसोटी क्रमवारीतील पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.