भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयकडून वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली आहे. या स्पर्धेला 14 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 15 मार्चला अंतिम सामना होणार आहे.
या हंगामातील सर्व सामने 4 शहरांमध्ये खेळवण्यात येतील. या स्पर्धेचं 4 शहरांमध्ये आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीत 8 सामने खेळणार आहे. पॉइंट्स टेबलमधील पहिल्या 2 टीम फायनलसाठी थेट क्वालिफाय होतील.
शुक्रवारी 14 फेब्रुवारीला गुजरात जायंट्स विरुद्ध गतविजेता रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामना हा 11 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे.