बीसीसीआयने आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक केले जाहीर!

WhatsApp Group

मुंबई – आयपीएल 2022 च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे. बीसीसीआयकडून आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे BCCI announced the schedule for TATA IPL. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPL 2022 चे वेळापत्रक आज म्हणजेच 6 मार्च, रविवारी प्रसिद्ध केले आहे. या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएल 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. यावेळी स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ सहभागी होतील. यावेळी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे 2 नवे संघ IPL खेळताना दिसतील.

इंडियन प्रीमियर लीग 2022 बदललेल्या फॉरमॅटमध्ये खेळली जाईल, ज्यामध्ये 10 संघांना प्रत्येकी पाच संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे, परंतु असे असूनही, प्रत्येक संघ पूर्वीप्रमाणे 14 सामने खेळेल.


मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स अ गटात आहेत तर चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.


सर्व संघ 14 मार्चपासून सराव सुरू करतील. यासाठी संघ सराव करतील अशी काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाण्यातील MCA स्टेडियम, डॉ. डीवाय पाटील युनिव्हर्सिटी ग्राउंड, CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) आणि फुटबॉल ग्राउंड येथे होणार आहे. 8 मार्चपासून खेळाडू येथे पोहोचण्याची शक्यता आहे.