बिग-बॅश लीग 2022-23 चा उत्साह अंतिम टप्प्यात आला आहे. लीगमधील सामने जसजसे पार पडत आहेत, तसतशी लीगची मजा द्विगुणित होत आहे. बिग-बॅश लीग 2022-23 मध्ये 8 जानेवारी रोजी सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंगने अविश्वसनीय झेल पकडत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. बेन कटिंगने पकडलेल्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कटिंगच्या या झेलची तुलना आयपीएल टीम आरसीबीचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे.
बिग बॅश लीगमध्ये रविवारी सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर्सने सिडनी सिक्सर्ससमोर विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य ठेवले होते, लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जेम्स विन्सने थर्ड मॅनच्या दिशेने हवेत शॉट खेळला, पण बेनने बाऊंड्री लाईनजवळ उडी मारली आणि ‘सुपरमॅन’प्रमाणे हवेत उडत झेल पकडला. बेन कटिंगच्या या झेलचे कौतुक होत आहे.
Ben Cutting with a HUGE specky on the boundary line! 🔥#BBL12 | @Toyota_Aus | #ohwhatafeeling pic.twitter.com/77hfwUTmCD
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2023
सिडनी सिक्सर्सचा कर्णधार मोझेस हेन्रिक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थंडरचा संपूर्ण संघ निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 133 धावाच करू शकला. सिडनी थंडरकडून सॅम व्हाइटमनच्या बॅटमधून सर्वाधिक 42 धावा आल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्स संघाने हे लक्ष्य 16.3 षटकांत सहज गाठले. सिक्सरने हा सामना 7 गडी राखून जिंकला.
BPL 2023: आधी ओरडला, नंतर बॅटने…शाकिब अल हसन पुन्हा एकदा अंपायरशी भिडला