
मुंबई : ठाकरे गटातील आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. भास्कर जाधव याना शोधून आणणाऱ्यांना 11 रुपये बक्षीस देण्यात येईल अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर कोणी लावले याबाबत काही माहिती समोर आली नाही. पण राज्यात गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद चांगलाचं तापला आहे.
राज्यात सध्या भास्कर जाधव विरुद्ध राणे कुटुंबीय असा सामना रंगला आहे. आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषदेमध्ये भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. T20 World Cup 2022: टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही! विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे धक्कादायक विधान
दरम्यान आता भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी करत जोरदार टीका केली आहे. भाजपकडून माहीममध्ये आपण यांना पाहिलत का? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच, शिधणाऱ्याला 11 रू बक्षीस, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. त्यामुळे, भाजप विरुद्ध ठाकरे गटाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.