
Bank Of Baroda Recruitment 2022 : बँकेमध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची इच्छा असणाऱ्या आणि नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2022) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
बँक ऑफ बडोदाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर 7 जुलै 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
रिक्त पदांचा तपशील
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर – 2 पदे
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट – 2 पदे
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट – 6 पदे
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर – 4 पदे
वयोमर्यादा
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर – 28 ते 35 वर्षे
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट – 28 ते 35 वर्षे
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट – 25 ते 32 वर्षे
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर – 25 ते 32 वर्षे
असा करा अर्ज
उमेदवारांना बँकेच्या www.bankofbaroda.in/Career.htm या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर करिअर विभागातील सक्रिय लिंकद्वारे उपलब्ध ऑनलाइन अर्ज स्वरूपात ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरून नोंदणी करत अर्ज फी भरावी लागणार.
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान, ११ उमेदवार रिंगणात
अनुभव
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट पदासाठी किमान 6 वर्षांचा अनुभव असावा
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा सायंटिस्ट पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – डेटा इंजिनीअर पदासाठी किमान एका वर्षाचा अनुभव असावा.