India vs Bangladesh: बांगलादेशने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

WhatsApp Group

India vs Bangladesh T20 WC : भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. बांगलादेशकडून सौम्या सरकारच्या जागी शोरफुल इस्लामला संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. दीपक हुडा या सामन्यात खेळत नाहीये.

उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशचा संघ चढ-उतार करत आहे, पण या सामन्यात भारत विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरणार आहे. गेल्या रविवारी पर्थ येथे झालेल्या कमी धावसंख्येच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५ विकेट्सने पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

जर भारताने हा सामना जिंकला तर ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचतील आणि उपांत्य फेरीच्या जवळ जाईल. दुसरीकडे, बांगलादेश जिंकल्यास उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदारही ठरेल आणि भारताचा ताण वाढेल.

बांगलादेशचा संघ – नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, शोरफुल इस्लाम, नुरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद

भारताचा संघ – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग