बांगलादेशने केला ओमानचा पराभव, सुपर-12 च्या आशा कायम!

शाकिब अल हसन ठरला बांगलादेशच्या विजयाचा हिरो

WhatsApp Group

मस्कट – बांगलादेशने (Bangladesh) पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ओमानचा (Oman) 26 धावांनी पराभव करत टी -20 विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवले आहे. ‘ब’ गटात असलेल्या बांगलादेशचा पात्रता फेरीतील हा पहिला विजय ठरला आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशला स्कॉटलंडकडून धक्कादायक पराभव स्विकारावा लागला होता.

ओमानविरुद्ध बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा केल्या होत्या. बांगलादेशसाछी मोहम्मद नईमने (Mohammad Naim) सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ओमानचा संघ 9 विकेट्सवर 127 धावाच करू शकला. दोन सामन्यांत ओमानचा हा पहिला पराभव आहे.


बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानची सुरुवात चांगली झाली नाही. सलामिवीर आकिबला मुस्तफिझूर रहमानने 6 धावावर बाद करत ओमानला पहिला धक्का दिला. ओमानसाठी जतिंदर सिंगने (Jatinder Singh) सर्वाधिक 40 धावा केल्या तक कश्यप प्रजापतीने 21 धावा केल्या. कश्यपच्या या छोटेखानी खेळीत एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

ओमानने आक्रमक सुरुवात करत पहिल्या 6.2 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. यानंतर ऑफस्पिनर मेहदी हसनने (Mahedi Hasan) दमदार गोलंदाजी करत ओमानच्या फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. मेहदीने 4 षटकांत फक्त 14 धावा दिल्या आणि कर्णधार झिशान (12) ची विकेट घेतली. तर मोठा फटका खेळण्याच्या नादात जतिंदर सिंग शाकिबच्या चेंडूवर बाद झाला. जतिंदरने 33 चेंडूंचा सामना केला. 4 चौकार आणि एक षटकारासह 40 धावा केल्या. ओमनला 20 षटकांत 9 गडी गमावत 127 धावा करता आल्या.

बांगलादेशसाठी मुस्तफिझूर रहमानने (Mustafizur Rahman) 4 ओव्हर्समध्ये 36 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल दाखवत 3 विकेट्सही मिळवल्या. फलंदाजी करताना शाकिबने 29 चेंडूत 42 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत 6 षटकारांचा समावेश होता. शाकिब अल हसनने केलेल्या दमदार कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.