वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स न्यूझीलंडला धूळ चारत बांगलादेशने मिळवला अविश्वसनिय विजय!

WhatsApp Group

बांगलादेश संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 गडी राखून दमदार विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. बांगलादेशला आपल्या दुसऱ्या डावात विजयासाठी 40 धावांची गरज होती. या लहान आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने हे आव्हान फक्त 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली आहे.

बांगलादेश संघाचा हा विजय ऐतिहासीक म्हणावा लागेल, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या न्यूझीलंच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारात न्यूझीलंडने मिळवलेला हा पहिला विजय ठरला आहे. विशेष म्हणजे बांगलादेशने क्रिकेटच्या ईतिहासात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव केला आहे. मोमिनुल हकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बांगलादेश संघाने या ऐतिहासिक विजयासह WTC क्रमवारीत 12 गुण मिळवले असून पाचवे स्थान पटकावले आहे.

या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 328 धावा केल्या होत. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने धमाकेदार फलंदाजी करत 458 धावा ठोकल्या आणि 130 धावांची शानदार आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या पूर्ण संघाला 169 धावांमध्ये माघारी धाडले. न्यूझीलंडचा संघ 169 धावांमध्ये सर्वबाद झाल्याने बांगलादेशला ऐतिहासीक विजयासाठी 40 धावांचे सोपे आव्हान मिळाले होते, हे आव्हान बांगलादेश संघाने सहजरीत्या 2 गडी गमावत पूर्ण केले.

बांगलादेशसाठी पहिल्या डावात कर्णधार मोमिनुल हकने सर्वाधिक 244 चेंडूमध्ये 88 धावांची शानदाज खेळी केली. तर लिटन दासने 86, महमुदुल हसन जॉयने 78, शांतोन 64 आणि मेहदी हसनने 47 धावांची खेळी केली. या सर्व फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात 10 विकेट गमावत 458 धावा केल्या. या कसोटी सामन्यात एकमेव शतक न्यूझीलंडच्या डेव्हन कॉनवेने झळकावले. मात्र त्याचे हे शानदार शतक त्याच्या संघाला जालिरवाण्या पराभवापासून वाचवू शकले नाही

या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाने न्यूझीलंडमध्ये एकही आंतरराष्ट्रीय विजय मिळवला नव्हता नाही. हा त्यांचा क्रिकेटच्या सर्वच प्रकारामध्ये न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला पहिलाच आंतरराष्ट्रीय विजय ठरला आहे. तसेच बांगलादेशचा सेना देशांमध्येही हा पहिलाच विजय ठरला आहे.


या सामन्यात बांगलादेशच्या विजयाचा सिंहाचा वाटा उचलला तो गोलंदाज इबादत हुसेनने. इबादतने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावात तब्बल 6 बळी घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. तसेच जवळपास 9 वर्षांनंतर बांगलादेशसाठी कसोटीत 5 बळी घेण्याचा कारनामा इबादत हुसेनने केला आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातही इबादतने 1 विकेट घेतला होता. त्याने घेतलेल्या या 7 विकेट्समुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.