इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेलेला सामना कमी धावसंख्येचा होता. मात्र हा सामना खूप अटीतटीच्या होता. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 विकेट्सने जिंकला RCB won by 3 wkts. सीनियर खेळाडू दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात एक षटकार, नंतर एक चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शेवटच्या 3 षटकात 24 धावांची गरज होती, पण विकेट पडल्यामुळे आरसीबीच्या अडचणीत वाढताना दिसत होत्या आणि केकेआरला पुनरागमनाची संधी मिळाली होती. मात्र कार्तिकने शेवटच्या षटकात एक षटकार, नंतर एक चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कार्तिकने पुन्हा एकदा आपण फिनिशर असल्याचे सिद्ध केले आहे. कार्तिकने केवळ सात चेंडू खेळून 14 धावा केल्या. यादरम्यान त्याने 1 षटकार आणि एक चौकार मारला, जे मॅच विनिंग शॉट्स होते.
That’s that from Match 6 of #TATAIPL.
A nail-biter and @RCBTweets win by 3 wickets.
Scorecard – https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/2PzouDTzsN
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. आरसीबीने अवघ्या 17 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. पॉवरप्लेमध्येच अनुज रावत, फाफ डू प्लेसिस, विराट कोहलीची विकेट पडली. या मोसमातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा पहिला विजय आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला पराभव आहे. यावेळी दोन्ही संघांचे 2-2 गुण झाले आहेत.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत केवळ 128 धावा केल्या होत्या. कोलकात्याची पहिली विकेट चौथ्या षटकात पडली आणि त्यानंतर हे चक्र सुरूच राहिले. केकेआरने आपला निम्मा संघ 67 धावांवर गमावला होता. अखेरीस आंद्रे रसेल आला आणि त्याने 25 धावांची जलद खेळी खेळली, त्यानंतर कोलकाताने 128 धावांपर्यंत मजल मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून वानिंदू हसरंगाने चार, तर युवा गोलंदाज आकाशदीपने तीन बळी घेतले.
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook