Ishan Kishan Double Century: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (Ind vs Ban ODI Series 2022) चट्टोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि धवन पाचव्या षटकातच 3 धावा काढून बाद झाला. यानंतर इशान किशनला विराट कोहलीची साथ लाभली. त्यानंतर इशान किशनने तूफान फटकेबाजी करत पहिले द्विशतक झळकावले आहे. इशान किशनने केवळ 126 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 23 चौकार आणि 9 षटकार निघाले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. या द्विशतकासह ईशान किशनने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये इशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतके झळकावली आहेत. मात्र, इशानने केवळ 126 चेंडूत द्विशतक झळकावले. 131 चेंडूत 210 धावा करून तो बाद झाला. आपल्या झंझावाती खेळीत त्याने 24 चौकार आणि 10 षटकार मारले.
𝟐𝟎𝟎 𝐑𝐔𝐍𝐒 𝐅𝐎𝐑 𝐈𝐒𝐇𝐀𝐍 𝐊𝐈𝐒𝐇𝐀𝐍 🔥🔥
𝐖𝐡𝐚𝐭 𝐚 𝐬𝐞𝐧𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐝𝐨𝐮𝐛𝐥𝐞 𝐡𝐮𝐧𝐝𝐫𝐞𝐝 𝐭𝐡𝐢𝐬 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐞𝐧.
He is the fourth Indian to do so. Take a bow, @ishankishan51 💥💥#BANvIND pic.twitter.com/Mqr2EdJUJv
— BCCI (@BCCI) December 10, 2022
इशान किशनने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. यासोबत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकत त्याने हा महान विक्रम केला. गेलने 138 चेंडूत द्विशतक झळकावले होते.
ईशाननेही हे रेकॉर्डही आपल्या नावावर केले
इशान किशन आता बांगलादेशविरुद्धच्या वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या (175) नावावर होता. याशिवाय ईशान किशन वनडेमध्ये सर्वात जलद 150 धावा करणारा फलंदाज बनला आहे. इशान किशनने आपल्या डावात एकूण 10 षटकार ठोकले. यासह तो बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे.