केदारनाथ मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी, नियम न पाळल्यास कडक कारवाई

WhatsApp Group

देशभरातील सर्वात प्रसिद्ध उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात यापुढे भक्तांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता येणार नाही. केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाणे, फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक वादग्रस्त व्हिडिओंमुळे श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने अलीकडेच केदारनाथ मंदिरात मोबाइल फोन घेऊन जाण्यास बंदी घातली आहे.

यासंदर्भात समितीने मंदिर परिसरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल घेऊन प्रवेश करू नका, मंदिराजवळ कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई आहे, असे या फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय, जर कोणी फोटो काढताना किंवा व्हिडीओ बनवताना पकडले गेले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा फलकावर मोठ्या अक्षरात लिहिला आहे.

श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजय अजेंद्र यांनी मीडिया एजन्सी एएनआयला सांगितले की, “काही यात्रेकरू मंदिराच्या आत अशोभनीय रीतीने व्हिडिओ आणि रील बनवत होते आणि फोटोही काढत होते, त्यामुळे फोनवर बंदी घालण्यात आली आहे.”

यापूर्वी, जम्मूच्या प्रसिद्ध बावे वाली माता मंदिरात भाविकांना शॉट्स घालण्यास बंदी घालण्यात आली होती. बावे वाली माता मंदिर समिती आणि बाजार असोसिएशनने मंदिर परिसरातही भाविकांनी डोके झाकणे आवश्यक असल्याचा निर्णय घेतला. मंदिर समितीच्या प्रमुखांनी सांगितले होते की, बरेच दिवस लोक डोके न झाकता मंदिरात येत होते, यासोबतच अनेक भाविक लहान कपडे घालून येथे पोहोचत होते. यामुळे आता मंदिरात दर्शनासाठी येणारे सर्वजण डोक्यावर पांघरूण घेऊनच येतील असे ठरले. त्याचबरोबर लहान कपडे घालून येणाऱ्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.