बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन

WhatsApp Group

पुणे – थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यामध्ये वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या आत्या तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत्या.

संजीवनी करंदीकर यांच्या निधनाचं वृत्त समजताच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.