उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही – बाळा नांदगावकर

WhatsApp Group

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाहीय, आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये असा सल्ला उद्धव ठाकरे यांना मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. तसेच बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका देखील केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गेले त्यावेळी ते बोलत होते.

“बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्वी सर्व घडत होते. मात्र आता ते दिवस राहिले नाहीयत, आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. काही लोक स्वतःला पक्ष प्रमुख समजून पक्ष चालवत असल्यामुळे हीच का ती शिवसेना अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. राज्यसभेच्या पराभवानंतर बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला टोला लागावला. राज्यसभेच्या निकालापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल ही अपेक्षा व्यक्त केली.