Bakri Eid 2023: बकरी ईदला घरीच बनवा ‘हा’ खास पदार्थ, जाणून घ्या रेसिपी…

WhatsApp Group
Bakri Eid 2022: ईद आणि बकरी ईद या पवित्र सणाला शिरखुरमा देऊन पाहुण्यांचे तोंड गोड करतात. बरेच लोक चव वाढवण्यासाठी केशर, वेलची पावडर आणि खसखस ​​घालतात. बकरी ईद सणासाठी तुम्ही घरीच खास शेवयांची खीर अर्थात शिरखुरमा बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला शिरखुरमाच्या रेसिपीबद्दल माहिती घेऊन आलो आहे. तुम्ही घरीच शिरखुरमा बनवू शकतात.

शिरखुरमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य…

  • शिरखुरम्यासाठी बारीक शेवया वापरू शकतात.
  • तूप – 2 टी स्पून
  • दूध क्रीम
  • साखर – एक कप
  • ड्राई फ्रूट्स मिक्स अर्थात सुका मेवा – 200 ग्रॅम
  • इलायची – 50 ग्रॅम

घरीच बनवा शिरखुरमा..

  • शेवयांची खीर अर्थात शिरखुरमा बनवण्यासाठी प्रथम शेवया चांगल्याप्रकारे भाजून घ्या.
  • शेवया खरपूस भाजल्यामुळे खीरची चव दुप्पट वाढते.
  • दूध क्रीम शेवयांमध्ये घालून 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • दूध घट्ट झाल्यावर शेवयामध्ये साखर घालून मिक्स करा.
  • साखर विरघळली की वर ड्रायफ्रुट्स टाका आणि इलायची घाला.
  • तुमची शेवयांची खीर आता तयार झाली आहे.