अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागच्या काही काळापासून सातत्याने काही ना काही कारणाने चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये अटक झाली होती. तो अलिकडेच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. अशातचं आता शिल्पाच्या आईच्या विरोधात अंधेरी न्यायालयाने जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान महानगर दंडाधिकारी आर आर खान यांनी या आधी शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात फसवणूकीच्या प्रकरणामध्ये समन्स बजावण्यात आले होते.

शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबीयांनी सत्र न्यायालयामध्ये या समन्सला आव्हान दिलं होतं. सोमवारी यावर न्यायाधीश ए झेड खान यांनी शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी यांच्या विरोधात महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र शिल्पाच्या आईला या प्रकरणामध्ये दिलासा मिळालेला नाही.
शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी आणि सुनंदा शेट्टी हे त्यांच्या कंपनीमध्ये भागीदार होते. मात्र त्यांच्या मुली शमिता आणि शिल्पा यात भागीदार होत्या याचा कोणताचं पुरावा नाही. तसेच या कर्जाशी त्यांचा काहीही संबंध असल्याचे समोर आलेलं नाही असे यावेळी न्यायालयाने सांगितलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आपल्या तक्रारीमध्ये एका व्यावसायिकाने आरोप केला होता की, सुरेंद्र शेट्टी यांनी २०१७ साली व्याजासह रक्कम परत करायची होती. तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलंय की, ‘शिल्पा, शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी २०१५ सालापर्यंत आपल्या वडिलांनी घेतलेले कर्ज चुकवलेलं नाहीय. शिल्पाच्या वडिलांनी या व्यावसायिकाकडून वयाच्या १८ व्या वर्षी प्रतिवर्ष व्याजाच्या हिशोबानम कर्ज घेतले होते. मात्र वडिलांच्या पश्चात हे कर्ज फेडण्यास शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने नकार दिला.’ असा आरोप या व्यावसायिकाने केला होता.