बैल पोळ्याच्या शुभेच्छा च्या WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा बळीराजाचा सण!

Bail Pola 2022 Wishes in Marathi बैल पोळा या सणाला पोळा असेही म्हटले जाते. तुम्ही जर बैल पोळा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या लेखात बरेच बैलपोळा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊ द्या रे पोटभरी
होऊ द्या रे मगदूल
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!
शिंगे घासली, बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली, मोरकी आवळली..
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!