चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, संघाचा ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

WhatsApp Group

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. या कालावधीत सीएसकेने 3 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. सीएसकेने या मोसमातील पाचवा सामना कोलकाता संघाविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान सीएसकेचा एक खेळाडूही जखमी झाला.

सीएसकेचा स्टार खेळाडू जखमी झाला
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे टेन्शन वाढले आहे. सीएसकेचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे जखमी झाला आहे. रहाणे हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याची दुखापत ही संघासाठी एक वाईट बातमी आहे.

आयपीएल 2024 मध्ये रहाणेची कामगिरी
अजिंक्य रहाणे या मोसमात आतापर्यंत 5 सामने खेळला आहे. या काळात रहाणेने 29.75 च्या सरासरीने आणि 130.77 च्या स्ट्राईक रेटने 119 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 177 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेने 30.95 च्या सरासरीने 4519 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.

चेन्नईने कोलकाताचा 7 विकेट्सनी पराभव केला
केकेआर विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात केकेआर संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता. पण 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 137 धावाच करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जने हे लक्ष्य केवळ 3 गडी गमावून पूर्ण केले. CSK कडून कर्णधार रुतुराज गायकवाडने 58 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी खेळली.