Babar Azam: बाबर आझमने केली मोठी कामगिरी, विराट कोहलीचा मोडला ‘हा’ मोठा विक्रम

WhatsApp Group

सध्या पाकिस्तानकचा कर्णधार बाबर आझम रेकॉर्ड्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये सुरू आहे. बुधवारी त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढत शतकांची दुसरी हॅटट्रिक केली. पाकिस्तानचा कर्णधार म्हणून तो सर्वात जलद 1000 धावा करणारा कर्णधार ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 17 डावात हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता.

पण बाबर आझमने बुधवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजविरुद्ध 103 धावांची शानदार खेळी करत हा विक्रम मोडीत काढला. अवघ्या 13 डावात त्याने ही कामगिरी केली. बाबर आझम बुधवारी पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम शैलीत दिसला. त्याने नऊ चौकारांसह गोलंदाजांवर दबाव ठेवत 103 चेंडूत 17 वे वनडे शतक पूर्ण केले.